धाराशिव (प्रतिनिधी)-राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली. बहुजनांना एकत्र करून पुरोगामी विचार दिला. शाहु महाराजांचे स्मारक धाराशिव शहरात उभे करण्यासाठी आमदार कैलास पाटील यांनी 25 लाख रूपये निधी जाहीर केला आहे. तर पालकमंत्री व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मदतीचा शब्द दिला आहे. त्यामुळे लवकरच शहरात राजर्षी छत्रपती शाहु महाराजांचे स्मारक उभारण्यात येईल अशी माहिती स्मारकर समितीचे अध्यक्ष बलराज रणदिवे यांनी कार्यक्रमात दिली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती धाराशिव च्या वतीने शाहू महाराज यांची जयंती शाहू महाराज चौक धाराशिव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी  राजर्षी छत्रपती  शाहू स्मारक समिती अध्यक्ष बलराज रणदिवे, सचिव बालाजी तांबे, प्रकाश खदारे, चंद्रसेन देशमुख, महादेव माळी, मुकेश नायगावकर, कुणाल निंबाळकर,मयूर काकडे, विशाल शिंगाडे प्रा. अभिमान हंगरकर,विष्णू इंगळे,रोहित पडवळ,खंडू राऊत,राहुल कोरे, रवी कोरे, संकेत सूर्यवंशी, अभिजीत सूर्यवंशी, राजेंद्र धावारे, काकासाहेब खोत, संदीप घोडके, अॅड. तस्लिम  काजी,राजाभाऊ पडवळ, राम कदम, आशिष पडवळ,श्रीनाथ पडवळ,अरविंद डोके, शेखर घोडके, आदी उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव माळी यांनी तर सूत्रसंचालन बालाजी तांबे यांनी केले. या कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार कुणाल निंबाळकर यांनी मानले.

 
Top