धाराशिव (प्रतिनिधी)- गुन्हेगारी आणि दारू विक्रीचा कलंक माथ्यावर घेऊन फिरणारे पारधी बांधव समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. अनेक पारधी बांधवांनी आता पशुपालन करुन दुग्ध व्यवसाय सुरु केला आहे. त्यामुळे या बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी रुपामाता उद्योग समुहाच्या वतीने दत्तनगर परिसरातील पारधी वसाहतीमधील पारधी बांधवांना कॅन्डचे वाटप करण्यात आले. आता आम्ही दारु नाही दुधच विकतो अशी ग्वाही यावेळी शेकडो पारधी बांधवांनी पोलीस अधीक्षकांसह रूपामाता उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड यांना दिली.

धाराशिव येथील रूपामाता उद्योग समुहाच्या वतीने तालुक्यातील ढोकी येथील दत्तनगर पारधी वसाहतीमध्ये पारधी समाजातील दुध उत्पादक बांधवांना दुध कॅन्ड वाटप आणि गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे, रूपामाता उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष अॅड.व्यंकटराव गुंड पाडोळीकर, किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतीश देशमुख, शामराव देशमुख, अॅड. अजित गुंड, गजानन पाटील,  ढोकी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राऊत, पोलीस उपनिरीक्षक बुद्धेवार, उपसरपंच अमोल समुद्रे, अॅड. तुकाराम शिंदे, दौलतराव गाढवे, राजेंद्र कापसे, राहुल पाटील, प्रमोद जोशी, माजी सरपंच नानासाहेब चव्हाण, संजय पावर, रुपामाता मिल्कचे दूध संकलन अधिकारी शुक्राचार्य घाडगे, रुपामाता अर्बन शाखा ढोकीचे व्यवस्थापक गजानन वैद्य, बाजीराव पवार,दादा काळे, अजित पवार,भारत जमदाडे, झुंबर बोडके,  हरिभाऊ तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना रूपामाता उद्योग समुहाचे संस्थापक अॅड. व्यंकटराव गुंड यांनी पारधी समाजातील युवकांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन करत रूपामाता परिवार तुम्हांसोबत असल्याची ग्वाही यावेळी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीजाई इंग्लिश स्कूलचे संस्थापक अंकुश जाधव यांनी केले. आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निहाल काझी यांनी मानले. कार्यक्रमाला ढोकी येथील ग्रामस्थ, दत्तनगर पारधी वसाहतीमधील पारधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रुपमाता परिवारची सामाजिक बांधिलकी

रुपामाता अर्बन सोसायटी च्या वतीने पिग्मी द्वारे पारधी समाजातील लोकांना बचतीचे महत्त्व पटवून देऊन, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. रूपामाता मिल्कने पारधी समाजातील 50 युवक, स्त्रियांना दूध व्यवसायाशी जोडून रोजगार मिळवून दिला आहे.


 
Top