तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेस अनादी कालापासुन मानवी शरीराचे अवयव दागदागिने नवसपुर्ती होताच किंवा श्रध्दे पोटी आकृतीबंद रुपात अर्पण करण्याची प्रथा परंपरा असुन ती आजही सोने चांदी वस्तू रुपात देविस आजही अर्पण करुन पाळली जात असल्याचे मोजदात दरम्यान दिसून आले.
श्री. तुळजाभवानी मातेस आपणास रोगराई होवु नये किंवा झाली तर दूर व्हावी. तसेच वंशाला दिवा मुलगा-मुलगी रुपात होण्यासाठी नवस बोलले जात असत. तो नवस पुर्ण झाल्यानंतर बोललेले मानवी अवयव आकृतीबंद वस्तु रुपात देविस श्रध्देपोटी भाविक अर्पण करुन नवसपुर्ती करतात.
या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मातेस वंशाचा दिव्यासाठी पाळणे, शारीरिक व्याधी होवु नये म्हणून डोळे, हात, पाय, कान, नाक, गड्डे काटे, नायटे सोने-चांदी रुपात दागिने मोजदात करताना आढळुन आले. सर्वाधिक गड्डे पाळणे सोने, चांदीचे आढळुन आले. सध्या हदयविकार, कँन्सर रुग्ण वाढत असुन यातुन बरे झालेल्या भाविकांनी छोट्या आकृतीबंद रुपात सोने चांदीचे हदय, स्तन आकृतीबंद ही मोजदात करताना आढळून आल्याचे समजते.
पुर्वी प्राचीन काळी श्री तुळजाभवानी मातेस नवसपुर्ती पोटी खापराचा नंतर न कुजणा-या कास लाकडाचा वस्तु नवसपुर्ती पोटी अर्पण करीत. कालातरांने जशीजशी प्रगती होत गेली तसतसे रुपे, पितळ, स्टील, अल्युममिनियम, तांबा ते आता सोने चांदी वस्तू पर्यत आले आहे. सध्या सोने चांदीच्या वस्तु मोठ्या प्रमाणात भाविक अर्पण करीत आहेत. तसेच हिरे माणीक मोते हेही अर्पण होत आहेत.
पाळणे शरीर अवयव आकृतीबंद रुपात सर्वाधिक अर्पण
श्री तुळजाभवानी मातेस नवसपुर्ती श्रध्देपोटी अर्पण वस्तूत सर्वाधिक डोळे, हात, पाय, कान, नाक, गड्डे वस्तु यांचा समावेश असून, हे नवसपुर्ती पोटी शेतकरी, सर्वसामान्य वर्गातील कष्टकरी भाविक अर्पण करतात. पाळणे कलश, छञ्या लिंग टोप आरती देविची मुर्ती, बिस्किट पुजेचे ताट कलश, अंगठ्या कळशी, घोडे, डोळे, हात, पाय, कान नाक, गड्डे पादुका, जोडवे, तांब्या पंचेपाञ टाक रुपात मुर्त्या छञ्या आदीसह अनेक वस्तुंचा समावेश आहे.