तुळजापूर (प्रतिनिधी) - रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांचा विचार करुन तात्काळ न्याय देण्याची मागणी उस्मानाबाद जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेने राज्य अन्न आयोग अध्यक्ष महेश ढवळे यांच्याकडे एका निवेदनद्वारे केली आहे.

रास्तभाव दुकानदाराच्या कमिशनमध्ये वाढत्या मुल्याकंनाप्रमाणे वाढ देण्यात यावी अथवा प्रति महिना मानधन लागू करावे. ईपोस मशिन जुन्या व नादुरूस्त झाल्याने अद्यावत मशिन देण्यात याव्यात, जिल्हयातील रास्तभावदुकानदाराना देण्यात येणारे धान्य नियतनापेक्षा प्रत्यक्ष मिळणारे धान्य या मध्ये तफावत आहे. ती तफावत दूर करून नियतनाप्रमाणे देण्यात यावी. जिल्हयातील रास्तभाव दुकानदारानी मुदतीत चलनाचा भरना करून मुळ परवाना दि. 

31 डिसेंबर पूर्वी जमा करूनही आजपर्यत नुतणीकरण झालेले नाही. तरी सर्वांचे मुळ परवाने तात्काळ नुतनणीकरण करून देण्याचे आदेश आपल्या मार्फत व्हावेत. ऐपीएल शेतकरी योजनेतर्ंगत महाराष्ट्र शासन डीबीटी द्वारे रोख रक्कम न देता रास्तभाव दुकानदारा मार्फत धान्याचे वाटप करावे जेणेकरून दुकानदाराच्या उत्पन्नात वाढ होईल. माहे जानेवारी 2023 ते माहे जुन 2023 पर्यतचे रास्तभाव दुकानदारांचे कमिशन तात्काळ अदा करावेत. जिल्हयातील ऐपीएल शेतकरी योजनेचे रास्त भाव दुकानादारानी चलनाद्वारे पैशाचा भरणा करूनही त्यांना धान्य उपलब्ध झाले नाही. तसेच सदर योजनेच्या सन - च्या चलनाची रक्कम अद्यापपर्यत अदा करण्यात आलेली नाही. जिल्हयातील किरकोळ हॉकर्स यांचे केरोसीन परवाने वारसाहक्काने वर्ग करण्यासाठीचे प्रलंबीत प्रस्ताव तात्काळ मान्य करून वारसांच्या नांवे वर्ग करण्याचे आदेश व्हावेत. हे निवेदन जिल्हा कोषाध्यक्ष प्रफुल्लकुमार अण्णा शेटे, काका कासार, मनेष सोनकवडे, राजकुमार पवार यांनी दिले.

 
Top