वाशी (प्रतिनिधी)-आविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंती निमित्त शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या आणि करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन सदरील पुरस्कार छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी येथील शिक्षक एस.बी.छबिले यांना डॉ. व्ही. टी. पाटील सभागृह कोल्हापूर येथे दि. 25 जून रोजी प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आसामी भाषेचे साहित्यिक गुवाहाटी आसाम पंकजलोचन बैश्य, दक्षिण विभागीय अध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा डॉ. एम. बी. शेख, सहायक पोलिस आयुक्तदिपक आर्वे, मराठी चित्रपट दिग्दर्शक सुनिल साळुंखे आणि पत्रकार आविष्कार फाऊंडेशन कोल्हापूरचे अध्यक्ष संजय पवार उपस्थित होते.

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी.टी.पाटील, व्हाइस जनरल सेक्रेटरी अरुण देबडवार, खजिनदार जयकुमारजी शितोळे, शालेय समिती चेअरमन सुरेशबप्पा पाटील, सर्व संस्था पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दादासाहेब चेडे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष राहुल कवडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एस.व्ही. गाढवे, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षक एस.बी.छबिले यांचे अभिनंदन केले आहे.


 
Top