धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी धाराशिवच्यावतीने जिल्हा कार्यालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी खर्‍या अर्थाने लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना राबविली. त्यांनी सामाजिक आणि आर्थिक सुधारणांचा पायाही घातला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हा कार्यालयात दि.26 जून रोजी ’सामाजिक न्याय दिन’ साजरा करण्यात आला.

माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एक राजा असूनही समाजातल्या वंचित, शोषित घटकांबद्दल असलेली आस्था शाहू महाराजांना एक वेगळाच राजा बनवते. समाजातल्या सर्व घटकांना एकत्र आणण्याचं काम शाहू महाराजांनी केलं असं ते म्हणाले.

यावेळी उपस्थित जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर, जि.प .माजी गट नेते महेंद्र  धूरगुडे, शहराध्यक्ष आयाज शेख, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके,जिल्हा उपाध्यक्ष कुणाल निंबाळकर, सांस्कृतिक विभाग सेल जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष अविनाश तांबारे, माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, बाबा मुजावर, महादेव माळी, तालुका उपाध्यक्ष बालाजी शिंदे, जयंत देशमुख, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष ज्योती माळाळे,बालाश्री पवार, लीगल सेल शहर अध्यक्ष अॅड. योगेश सोन्ने  पाटील, शहर उपाध्यक्ष राजकुमार पवार, रणवीर इंगळे,पंकज भोसले, राजपाल दुधभाते, अभिजित काळे आदी उपस्थित होते.


 
Top