धाराशिव (प्रतिनिधी)-विद्यानगर बावी येथील वसंत प्राथमिक जवाहर माध्यमिक व जवाहर कनिष्ठ महाविद्यालय येथे राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक साकळे बी. एस. यांनी केले. यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव दयानंद मनोहरराव राठोड यांनी राजर्षी शाहू महाराज यांचा जीवनपट सांगून, माणूस नशिबाने घडत नाही तर कर्माने घडतो.  म्हणून कर्म नेहमी चांगले करा असे आवाहन केले. अध्यक्षिय समारोप करताना ए. आर. देशमुख यांनी सर्व घटकावर आधारित मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्राध्यापक विनोद राठोड यांनी केले.


 
Top