तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदीर परिसरातील चप्पल स्टँड येथे लहान मुलाचा गळ्यातील सोन्याची चैन चोरी प्रकरणी काही तासात तुळजापूर पोलिसांनी चोरट्यास ताब्यात घेतले सदरील घटना मंगळवार दिरोजी मंदीर परिसरात घडली.
या बाबतीत अधिक माहिती अशी की, दि. 27 जून रोजी 11 वा. सुमारास निंगन्ना भिमसिंग राठोड, वय 25 वर्ष रा. कोळीहाल तांडा, ता. हुनस्की, जि. यादगीर, राज्य कर्नाटक या त्यांचे कुटुंबासह तुळजापुर येथील श्री. तुळजाभवानी मंदीर येथे दर्शनास आल्या होत्या. दरम्यान चप्पल स्टॅन्ड समोर तुळजापूर येथे अज्ञात व्यक्तीने निंगन्ना यांचे लहान मुलाचे गळ्यातील 6 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन एकुण 30,000 किंमतीची लुटून पसार झाला होता. याची तक्रार प्राप्त होताच तुळजापूर पोलिसांनी गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बेकराई नगर, हडपसर, ता. पुणे येथील- तानाजी रामा जाधव यास गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासांत श्री तुळजाभवानी मंदीरासमोर परिसरातील चप्पल स्टॅन्ड तुळजापूर येथुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने प्रथमत: पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील गेला माला 6 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा माल हस्तगत करुन पुढील कार्यवाहिस्तव त्यास चोरीच्या मालासह ताब्यात घेवून सदर गुन्ह्याच्या तपास कामी अटक केली असुन पोलीस सदर गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, चास्कर, लोखंडे, ज्ञानेश्वर माळी यांचे पथकाने केली आहे.