धाराशिव (प्रतिनिधी)-विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा धाराशिवच्या वतीने 1 ते 8 जुलै 2023 दरम्यान सकाळी 6.00 ते 7.30 या वेळेत ’सर्वांसाठी प्राणायाम’ सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काही सूक्ष्म व्यायाम, आवश्यक शिथिलीकरण, प्राणायामचा अभ्यास घेण्यात येणार आहे. सत्र घेण्यासाठी कन्याकुमारीहून प्रशिक्षित शिक्षक असणार आहेत. यात प्रात्यक्षिक आणि व्याख्यान दोन्हीचा अंतर्भाव आहे.
आज संपूर्ण जगात योगाचे महत्व वाढले असून अनेक मोठे डॉक्टर देखील दररोज योग व प्राणायाम करतात. नित्य प्राणायामचा अभ्यास केल्याने आपल्यात सकारात्मक ऊर्जा येते, चेहर्यावर तेज येते. त्यामुळे तणाव मुक्त जीवन जगण्यासाठी प्राणायाम सत्रात भाग घेतलेच पाहिजे. सदर सत्र सत्संग हॉल, शामराव दहिटणकर, नाईकवाडी नगर, धाराशिव. येथे होणार असून यासाठी शामराव दहिटणकर 9657017018 आणि निलेश कुलकर्णी 9096292476 या क्रमांकावर संपर्क करावा.