धाराशिव (प्रतिनिधी)-आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित के .टी .पाटील संगणकशास्त्र महाविद्यालय व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत छत्रपती शाहू महाराज भोसले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली.  1894 मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते 1922 मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.

यावेळी कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. अजित मसलेकर,प्रा पराग कुलकर्णी, डॉ कृष्णा तेरकर, प्रा शुभम पाटील, प्रा.गवळी मॅडम, प्रा. मुंढे राघवेंद्र, प्रा.शेख मॅडम, अजय शिराळ, राजाभाऊ जाधव, सय्यद, सुदर्शन कुलकर्णी, प्रवीण पांचाळ, मनीयार वकील तसेच उपस्थितीत विद्यार्थी व विद्यार्थिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.


 
Top