धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी  महाविद्यालयातील प्रा.डॉ.वैभव आगळे यांनी राजर्षी शाहू महाराज  यांच्या कार्यावर आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही जे  देशमुख या उपस्थित होत्या. पुढे बोलत असताना डॉ. आगळे असे म्हणाले की, आधुनिक  ग्रामीण महाराष्ट्राची  वैचारिक भरण पोषण हे फुले- शाहू- आंबेडकर, या महामानवांनी  केलेले आहे. त्यामुळे त्यांचे विचार समाजासाठी अत्यंत मुलाचे आहेत. यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top