तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीरात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या दौर्याचे वृत्त संकलना साठी मंदिरात जाणार्या माध्यम कर्मीना बीव्हीजी कंपनीच्या खाजगी सुरक्षा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडुन धक्काबुक्कीस सामोरे जावे लागले. बीव्हीजी कंपनीचे सुरक्षा रक्षक माध्यमकर्मीशी धक्काबुक्की करण्यास भीत नसतील तर भाविकांचे ही मंडळी दर्शन घडविताना काय करीत असतील देवीच जानो.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान ने भाविकांना दर्शन घडविण्यासाठी मंदिरात शिस्त लावण्यासाठी बीव्हीजी कंपनीचे खाजगी सुरक्षा रक्षक तैनात केले असुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले श्री तुळजाभवानी दर्शनार्थ आले असता माध्यम कर्मी त्यांच्या या दौर्याचे वृत्त संकलनासाठी गेले. देवी मंदिरात जाताना पितळी दरवाजा जवळ त्यांना अडवले व धक्काबुक्की केली.
श्री तुळजाभवानी मंदिरात सुरक्षारक्षक पुरवणार्या ठेकेदाराने अशिक्षित अनअनुभवी तरुणांची भरती मंदिरात सुरक्षा रक्षक म्हणून केल्याने मंदिरात सर्वसामान्य भाविकांना सुलभ दर्शन घडत नाही. मंदिरात ड्रेस कोड लागु केल्यानंतर चक्क दहा वर्षाचा बालकास वेस्टर्न हाफ चड्डी कपडे घातले म्हणून मंदिरात दर्शनार्थ सोडले नाही. यामुळे मंदिर प्रशासनाला बदनामीला सामोरे जावे लागले.