तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदी वितळवण्यासाठी मोजदाद करण्याचा प्रक्रियेस दि 7 जूर रोजी आरंभ झाला होता. ही मोजदाद आज संपुन सुमारे सोने 207 किलो, चांदी 3600 किलोची मोजदात करण्यात आली. सदरील मोजदाद प्रक्रिया कडक सुरक्षा व्यवस्येत सीसीटीव्ही देखरेखखाली करण्यात आली. सदरील मोजदाद प्रक्रिया श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी नेमलेल्या पडताळणी समोर करण्यात आली.
यात भाविकांनी नवसपुर्ती व श्रध्देपोटी अर्पण केलेले सोने चांदी हीरे माणीक मोत्याची मोजदाद करण्यात आली. नंतर श्रीतुळजाभवानी मातेच्या पुरातण अशा सात डब्यातील सोनेचांदी अर्पण वस्तू मोजण्यात आली. यात सुवर्ण अलंकार डबा नंबर 1 व डबा नंबर 6 जे की श्री तुळजाभवानी मातेस सुवर्ण अलंकार घातले त्याची तसेच भाविकांनी अर्पण केलेल्या सोने, चांदी दागिने, हिरे यांची मोजदाद करण्यात आली. तसेच देविजींच्या छबिन्या उत्सव मुर्ती तसेच वस्ञविना मुर्ती ही पुण्याच्या देवी भक्त. उडांळे यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला अर्पण केल्या आहेत.तसेच पुतळाबाई म्हणजे हातात दिवे घेतलेली तसेच महिषासुर वध केलेली चांदी मुर्ती ही पुरातन आहे. निजाम कालीन ते आजपर्यत पुरातन ऐतिहासिक वस्तुंची मोजदात करण्यात आली. छञपती शिवाजी महाराज महिषासुर व रेडा ही मुर्ती प्राचीन मुर्त्या असुन या शारदीय शांकभरी नवराञोत्सवात वापरल्या जातात अंदाजे 1318 किंवा पासुनचा 1909 पुरातन वस्तुंची मोजदाद करण्यात आली.