धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील शिक्षक कॉलनी ते रेल्वे स्टेशन रोडच्या कामाची तात्काळ स्वतंत्र चौकशी समिती नेमुण चौकशीअंती ठेकेदारावरती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम आदिमी पार्टी तिव्र आंदोलन करणार असल्यांचा इशारा आम आदमी पार्टीचे अॅड. अजित खोत यांनी दिला आहे. 

शहरातील शिक्षक कॉलनी ते रेल्वे स्टेशन रोड या रोडचे काम 70 टक्के काम पूर्ण झाले असून सदरील कामाची निवीदा रक्कम ही 5 कोटी आहे. हे काम अजमेरा हा ठेकदार आहेत. सदरील काम हे इस्टीमेट प्रमाणे झालेले नसून शाळेसमोरील रस्ता हा अतिशय निकृष्ठपणे बनवलेला आहे . व त्याठिकाणी 4 इंच 60 एम एम खड़ी पहिला लिएर 6 इंच 60 एम एम ची खडी दुसरा लिएर,  इंची  एम एम खडीचा लेएर व 3 इसी बी बी एम व 20 एम एम चा अंतिम लिएर अशी इस्टीमेंट मध्ये तरतुद आहे . वास्तविक पाहता इस्टीमेटमध्ये दर्शविल्याप्रमाणे सदरील ठिकाणी  कोणतेही काम ठेकदाराने केलेले नाही . त्याचप्रमाणे बागल वस्तीजवळ सिमेंट रस्त्याचे काम प्रस्तावित असून त्याठिकाणी 6 इंच 60 एम एम ची खडी व 8 इंच मुख्म भरई करणे आवश्यक होते. वास्तविक त्या ठिकाणी 20 एम एम ची खडी ठेकेदाराने रस्त्यावर टाकली असन सदर 20 एम एम ची खडी वापरली तर रस्ता हा अतिशय निकृष्ठ दर्जाचा होणार आहे. त्यावरील दोन्ही बाबी संबंधीत कार्यालय  अधिकार्‍यांना माहित असताना देखील इस्टीमेट प्रमाणे काम होत नाही याची पूर्व शिक्षक कॉलनी ते रेल्वे स्टेशन रोडचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले. या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी या कामाची अधीक्षक अभियंता दक्षता व गुण नियंत्रण विभाग संभाजीनगर यांचा तपासणी अहवाल घ्या असा आदेश दिला आहे.


 
Top