धाराशिव (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ भाजपच्या वतीने  संपर्क से समर्थन अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हयातील अभिनयाची सुरुवात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक  येथून करण्यात आली. या  भागातील नागरिक, छोटे व्यापारी, दुकानदार यांचा या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या संकल्पनेतून भाजपच्या वतीने 20 ते 30 जून या कालावधीत राज्यभर ’संपर्क से समर्थन’ अभियान राबविण्यात येत आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांपासून ते भाजी विक्रेता, फेरीवाले,  केंद्र सरकारच्या विवीध योजनांचे लाभार्थी यांच्या भेटी घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मागील 9 वर्षात केलेली कामगिरी आणि राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती असणारे पोम्प्लेट स्वतः नागरिकांना वितरित करण्यात आले. तसेच 9090902024 या मोबाईल क्रमांक वर मिसड कॉल करून पंतप्रधान मोदींना समर्थन देण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात आले. या आव्हानास उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रत्येकांनी लगेच आपापल्या मोबाईलवरून मिस्ड कॉल करून पंतप्रधानांना समर्थन दिले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन काळे, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, प्र. का. सदस्य  युवराज नळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, श्री. अभय इंगळे, दत्ता पेठे, श्री. बापू पवार, अभिजित काकडे, शहराध्यक्ष राहुल काकडे, विलास लोंढे, संदीप इंगळे, श्री.प्रविण पाठक, नरेन वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


 
Top