धाराशिव (प्रतिनिधी)-गेल्या 20 वर्षापासून श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात होते. पालकांना विश्वासात घेवून शाळेचे प्रगतीचा अहवाल सांगितला जात होतो. त्यामुळेच दरवर्षी मेडिकल व इंजिनिरींगला आमच्या शाळेचे विद्यार्थी लागत होते. परंतु यंदा प्रथमच शाळेचे पाच विद्यार्थी आयआयटीला लागले आहेत. इतर काही संस्था जाहिरातीवर 3 कोटी रूपये खर्च करतात पण आम्ही मात्र विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्यावर भर देतो. गेल्या 20 वर्षाचे अथक परिश्रमाचेफळ म्हणजे यंदा प्रथमच .5 विद्यार्थी आयआयटीला लागले आहेत अशी माहिती आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राजवीर लोमटे, समर्थ घोगरे, सुजित शिंदे, राधा सुपतगावकर, हर्षल ओव्हाळ या विद्यार्थ्यांचा आयआयटीला प्रवेश झाला आहे. तर श्रेया कानडे, फयजान शेख यांचा मेडिकला प्रवेश झाला आहे.  10 वी नंतर लातूर, औरंगाबाद, कोटा, हैद्राबाद अशा ठिकाणी जेईइ व नीटच्या तयारीसाठी विद्यार्थी  जातात. त्यामुळे पालकांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये दिल्ली, कोटा येथील अनुभवी व तज्ञ प्राध्यापक नेमण्यात आले आहेत.फोटॉन व फोरोमल बॅचेस सुरू करण्यात आल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा बुध्यांक इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपेक्षा चांगला आहे. त्यांना फ्नत योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर यश निश्चित मिळते असे सांगून सुधीर पाटील यांनी महाराष्ट्रात 10 वीला सगळ्यात जास्त विद्यार्थी 1200 होते. तर देशी केंद्र लातूर येथे 800 विद्यार्थी होते. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख देशमुख, प्रशासकीय अधिकारी अदित्य पाटील आदी उपस्थित होते. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.


सगळ्यांच शाळेने प्रयत्न करणे गरजेचे

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी संगळ्याच शाळेनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु असे होत नाही. त्यामुळे पहिले ते चौथी विद्यार्थी प्रवेशासाठी 1 हजार विद्यार्थी वेटींग लिस्टवर आहेत असे सांगून पाटील यांनी पुरविच्या काळात शाळेचे इन्सपे्नशन होत होते. मात्र गेल्या काही वर्षापासून ते बंद झाले आहे. त्यामुळे शाळेचा दर्जा घसरत आहे असेही सुधीर पाटील यांनी सांगितले.


सामाजिक बांधिलकी

शाळेत प्रवेश देताना प्रत्येक वेळेस आर्थिक व्यवहार पाहिला जात नाही असे सांगून सुधीर पाटील यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त पाल्य व अन्य पाल्यांना आर्थिक स्थिती पाहून आम्ही त्यांना पूर्ण मदत करतो. सामाजिक बांधिलकी संस्था जपत आहे. के. टी. पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे आर्थिक व्यवहार न पाहता सामाजिक बांधिलकीतून काम केले जाते असे सुधीर पाटील यांनी सांगितले. 

 
Top