धाराशिव (प्रतिनिधी)-उमरगा येथे नगर परिषदेच्या अंतुबळी सभागृहात येथे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
या जनता दरबारमध्ये उमरगा तालुक्यातील नागरिकांकडून महसूल विभाग, महावितरण, जिल्हा परिषद, वनविभाग, आरोग्य, शिक्षण विभाग, पंचायत समिती (घरकुल, शौचालय) पशुसंवर्धन, पीक कर्ज, पोलीस अनुषंगाने एकूण 135 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त तक्रारी पैकी सर्वाधिक तक्रारी महसूल प्रशासन संदर्भात प्राप्त झाल्या होत्या. तसेच संबंधित विभागाच्या अधिकार्यांस तक्रारीचे जागेवर निवारण खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले. उमरगा तालुक्यातील नागरिकांकडून खासदार राजेनिंबाळकर यांचे आभार व्यक्त करुन समाधान व्यक्त केले. भविष्यात सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीची दखल तात्काळ घेवून नागरिकांचे समस्या निराकरण करण्याबाबत उपस्थित सर्व अधिकारी वर्गाना सूचना करण्यात आले.
त्यानंतर सोलापूर- उमरगा राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित चालू कामाचा आढावा घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूरचे प्रकल्प संचालक व संबंधित कंत्राटदारांना नागरिकांच्या तक्रारी सबंधित तक्रारीचे निराकरण 8 दिवसाच्या आत करण्यास सांगितले.