धाराशिव (प्रतिनिधी)- टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूरच्या वतीने दि. 22 ते 27 दरम्यान जी 20 सप्ताह साजरा करण्यात येत आहे.  यामध्ये शाश्वत विकासाचे उद्देश, त्याचे महत्व व सद्य स्तिथीत, वातावरण बदलामुळे होणारे परिणाम आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरता व एकात्मता यासारख्या जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी जी 20 करत असलेल्या कार्य करते व त्याच्या व्याप्तीची जनजागृती करण्याच्या अनुषंगाने टीस लाइफ मिशन आणि एकता: न्याय्य भविष्यासाठी जागतिक मूल्यांवर संवाद व वसुदेव कुटुंबकम या थीमवर विविध कार्यक्रम घेत आहे. 

आझादी का अमृत महोत्सवा बरोबरच व 20 च्या अनुषंगाने शाश्वत विकासाच्या उद्देशांचे व वातावरण बदलामध्ये सेंद्रीय शेताची महत्व या विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.कार्यशाळेचे उदघाटन प्रो. रमेश जारे, उपसंचालक टीस तुळजापूर यांच्या हस्ते करण्यात आले.  

या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाश्वत विकास गोलचे अभ्यासक अभिलाष गोरे, डॉ. श्रीधर सामंत, सेंद्रीय शेती तज्ञ गणेश चादरे, सामाजिक कार्यकर्ते आनंद भालेराव, शंकर ठाकरे, धनाजी धोतरकर हे उपस्थित होते.  या प्रसंगी, रमेश जारे पुढे बोलताना म्हणाले की, जागतिक एकात्मता व शाश्वत विकासासाठी जी 20 चे कार्य दिशादर्शक असून त्या अनुषंगाने टीस हे विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेत आहे.  शाश्वत ग्राम व देश विकासासाठी टाटा सामाजिक संस्था ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.   

याप्रसंगी अभिलाष गोरे यांनी म्हणाले की, शाश्वत विकासाचे 17 उद्देशाचे विश्लेषण करून उपस्थितांना ऑरगॅनिक पासपोर्टची संकल्पना सांगितली. ते पुढे बोलताना म्हणाले की, शाश्वत विकासाचे उद्देश सफल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकंसहभागाची गरज आहे.  या प्रसंगी, गणेश चादरे यांनी वातावरण बदलामध्ये सेंद्रीय शेताची महत्व या विषयावर मार्गदर्शन केले, ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम हा लोकली होऊ लागला आहे हा चिंतेचा व चिंतनाचा विषय आहे.  त्यावरती शाश्वत उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे त्याचे संवर्धन करणे, जल पुनर्भरण करणे व मोठ्या प्रमाणात सेंद्रीयशेतीला चालना देण्याची गरज आहे.  जुन महिना संपत आला तरी पण पाऊस पडत नाही हे ही वातावरण बदलाच्या परिणामातील ज्वलंत उदाहरण असल्याचे सांगितले व येणार्‍या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व सेंद्रीयशेती करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आव्हान केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आनंद भालेराव यांनी जी 20 उद्देश सांगितले.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शंकर ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमामध्ये तुळजापूर, धाराशिव, परंडा, लोहारा  तालुक्यातील शेतकर्‍यांनी सहभाग घेतला.


 
Top