तुळजापूर-  जिल्ह्याच्या दृष्टीने राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असणार्‍या तुळजापूर नगर पालिकेच्या विकास कामांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी मंजूर केला आहे

अशी माहिती पञकार परिषद घेवुन माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी व विनोद गंगणे यांनी दिली

सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत 40 रस्त्यांच्या कामासाठी 158.52 कोटी, परिक्षेत्र विकास निधी  6 कोटी, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 5.94 कोटी रुपये, वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत सुरेख स्मृती रेस्ट हाऊस येथे अद्ययावत धर्मशाळा बांधण्यासाठी 1.40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत

शहरातील विविध रस्त्यांसाठी व विकास कामांसाठी एवढा भरीव निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्रात शिंदे -फडणवीस सरकार आल्यापासून विविध विकास कामांसाठी निधीची कमतरता जाणवत नसल्याचे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये नमूद केले. भाजपा कार्यालय तुळजापूर येथे पत्रकार परिषद आयोजित पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जनराव साळुंके, माजी नगराध्यक्ष पंडितराव जगदाळे, युवा नेते विनोद पिटू गंगणे, माजी नगरसेवक अमर हंगरगेकर, भाजपा शहराध्यक्ष शांताराम पेंदे,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, गणेश भिंगारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top