धाराशिव (प्रतिनिधी)-जागतिक रक्तदान या दिवसाचे औचित्य साधून उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये एकूण 11 कर्मचार्यांनी रक्तदान केलेला आहे.
यात प्रामुख्याने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय घोणसे पाटील, शेती कर्ज विभागाचे मुख्याधिकारी शहाजी पाटील, आयटी विभागातील कर्मचारी, शेती कर्ज,
अकाउंट विभागातील, कायदा विभागातील कर्मचारी इत्यादी असे एकूण 11 कर्मचार्यांनी आजच्या या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केलेला आहे.
या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उपाध्यक्ष मधुकर मोटेे, जिल्हा बँकेचे संचालक संजय देशमुख यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी जिल्हा बँक मुख्यालयातील कर्मचारी अधिकारी शिपाई सर्व उपस्थित होते.