धाराशिव (प्रतिनीधी) :-  शहरातील दोन शाळेत शालेय साहित्य विक्री,आर.टी.आय,च्या विद्यार्थी यांच्या कडून पैसे घेणे,मनमानी पद्धतीने फिस वाट करणे, सर्व सामान्य पालकांना लाखों रुपयांची लुटमार करीत असलेची तक्रार शिक्षण विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद तसेच उपसंचालक शिक्षण विभाग लातूर येथे सन ते येथे मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी तक्रार दाखल केली होती मधेच दोन ते तिन वर्षे कोरोना मध्ये गेले त्यामुळे पाठपुरावा करता आला नाही दिनांक 22/05/2023 रोजी शिक्षण उपसंचालक यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले व दोन्ही शाळेची मान्यता काढण्यात यावी तसेच उस्मानाबाद शहरातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये राजरोसपणे वह्या पुस्तके, गणवेश,चाढ्या दराने विक्री करून सर्व सामान्य पालकांची लुट करत आहेत तरी एक समिती स्थापन करून सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळेची चौकशी करावी असे निवेदन मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी दिले आहे..


 
Top