धाराशिव (प्रतिनीधी) :- धाराशिव शहरातील सिविल हॉस्पिटल च्या मागे पापनाश मंदिराजवळ असणार्या श्री विठ्ठल बिरुदेव मंदिराचा कळस रोहन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. लोकसहभागातून मागील महिन्यात मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण झाले होते. काल कलश रोहन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये कलशाची मिरवणूक, परस खेळणे, धनगरी ओव्या, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कलश मिरवणूक सोहळा शहरातील काळा मारुती मंदिर येथून सुरू झाला. काळा मारुती येथे कलशाची विधिवत पूजा करून कलशाची मिरवणूक काळा मारुती, धनगर गल्ली, तांबरी विभागातून श्री विठ्ठल बिरुदेव मंदिराकडे गेली. या कलश मिरवणूक सोहळ्यामध्ये ढोलकरी, इरकरी, भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.