धाराशिव (प्रतिनीधी) :- धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्य साधून 65 फूट उंच भगव्या ध्वजाची प्रतिष्ठापना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आली.  प्राचीन काळापासून त्यागाचे, बलिदानाचे, शौर्याचे, देवदेवतांचे, वारकर्‍यांचे, अंधार दूर करणार्‍या सुर्योदयाचे प्रतीक असणारा, शिवरायांची आणि महाराष्ट्राची अस्मिता असणार्‍या भगव्या ध्वजाची छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिष्ठापना करायची असे मध्यवर्ती सार्वजनिक शंभुराजे जयंती उत्सव समितीच्या नुतन कार्यकारिणीच्या बैठकीत ठरले.  मागील आठवड्यातच ग्रामपंचायत मार्फत ग्रामसभेत ठराव घेऊन गावातील मुख्य चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले होते त्याच चौकात लोकसहभागातून, लोकवर्गणीतून मध्यवर्ती सार्वजनिक शंभूराजे जयंती उत्सव समिती केशेगाव मार्फत आज 65 कोटी उंच भगव्या ध्वजाची प्रतिष्ठापना व पुजन शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे पदाधिकारी, मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती समिती धाराशिवचे पदाधिकारी व  गावकरी यांनी केले. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे धर्मराज सूर्यवंशी, रवी मुंडे, जयराज खोचरे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे बलराज रणदिवे, प्रा.मनोज डोलारे, शंभूराजे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक चराटे, गावचे सरपंच अभिजीत पाटील, उपसरपंच बालाजी शिंदे, मा.जि.प.सदस्य भारत डोलारे, रामेश्वर शिंदे, प्रभुलिंग वाघाळे, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश कोळगे, अरुण सुग्रीव कोळगे, अमोल पाटील, शाहू माळी, मध्यवर्ती सार्वजनिक शंभूराजे जयंती समितीचे कार्तिक कोळगे, गणेश सावळकर, समाधान देशमुख, समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top