तुळजापूर / प्रतिनिधी-

 राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेताच तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रवादीकाँग्रेसपार्टी कार्यकत्यांन मध्ये एकच खळबळ उडाली 

मंगळवार सांयकाळी तात्काळ बैठक घेवुन यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी यांनी सामुहीक राजीनामे प्रदेश कार्यालयाला पाठवायाचा निर्णय घेतला..शरद पवार पुनश्च राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुरा हाती घेत नाहीत तो पर्यत राजीनामे मागे न घेण्याचा निर्णय या बैठकीत ऐकमताने घेण्यात आला. या बैठकीला युवा पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थितीत होते .

यावेळी युवा कार्यकत्यांनी वस्ताद कधीही कुस्ती सोडत नसतो तो आणखी नव्या जोमाने पैलवानांची भावी पिढी घडवत असतो. साहेब तुम्ही आमच्या पाठीशी होता.  आहात आणि कायम राहाल..! साहेब..! ही आपल्या कडुन ऐकमेव्य अपेक्षा !!! असे अनेकांनी मार्गदर्शन करताना सांगुन  पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाला कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला आहे

 
Top