धाराशिव / प्रतिनिधी-
कैलास पाटील यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून भिम नगर येथील क्रांती चौकाचे बौध्द पोर्णिमेचे औचित्य साधून सुशोभिकरणाचा लोकार्पण सोहळा दि. 05/05/2023 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. सदर सुशोभिकरणासाठी धाराशिव-कळंब विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री. कैलास (दादा) पाटील यांनी त्यांच्या आमदार निधीतून रु. 8 लक्ष एवढा निधी उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे भिमनगर वासियांकडून प्रथमत: आभार. तरी या क्रांती चौक सुशोभिकरणाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी नवज्योत शिंगाडे यांनी प्रयत्न केले.
सदरील सुशोभिकरणात सिंहमुद्रा, अशोक चक्र व त्या बाजूस कोरीव काम, संविधान लिहणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हात व सुर्य असे या सुशोभिकरणाचे चित्र असून सदरील सुशोभिकरणातील शिल्पाचे शिल्पकार सुहास सुतार रा. वौराग ता. बार्शी जि. सोलापूर यांनी काम केले आहे.
सदर कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंजराजे निंबाळकर, न.प. मुख्याधिकारी वसुधा फड या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. तरी सदरील कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नवज्योत शिंगाडे यांनी केले आहे.