शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था व वाढीव वस्यांतामध्ये रस्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिवकळंबवाशीतुळजापूर व नळदुर्ग शहरातील रस्ते विकासाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित मुख्याधिकारी यांना दिल्या होत्या. तसेच दि. १६ एप्रिल रोजी धाराशिव येथे व दि. २९ एप्रिल रोजी कळंब येथे पत्रकार परिषद घेवून याबाबतची माहिती दिली होती. नगर विकास विभागाच्या आज झालेल्या बैठकीत धाराशिवतुळजापूर व नळदुर्ग शहरातील ३७९ कोटी रुपयांच्या रस्ते व नाली कामांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत मंजूरी देण्यात आली आल्याची माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी  दिली आहे.

धाराशिव शहरातील रस्ते व नाली बांधकामासाठी रु. १५४ कोटी चा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्याचप्रमाणे तुळजापूर शहराचा रु.१७३ कोटीचा व नळदुर्ग शहराचा रु.१०४ कोटींचा आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला होता. सदरील प्रस्तावांना मंजूर देणेबाबत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत राज्यस्तरीय प्रकल्प समितीची आज नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस नगर विकास विभागाचे प्रधान सचिव श्रीमती सानिया शेट्टीउपसचिव श्रीकांत आंडगेआयुक्त तथा संचालक नगर विकास प्रशासन संचालनालय डॉ.किरण कुलकर्णी उपस्थित होते. सदरील बैठकीत धाराशिव शहरतील  रु. १४७ कोटी, तुळजापूरसाठी रु. १३९ कोटी व नळदुर्ग साठी रु. ९७ कोटींच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे.

शहर विकासाच्या इतर मुद्यांवर संबंधित शहरातील नागरिकांकडून त्यांच्या सूचना व संकल्पना मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी यापूर्वी केले आहे. त्या त्या भागातील नागरिकांच्या गरजा व शहर विकासाच्या त्यांच्या संकल्पना विचारात घेऊन परिपूर्ण आराखडा बनविण्यात येणार आहे व या सूचनांच्या अनुषंगाने महिना अखेर संबंधित शहरामध्ये आ.राणाजगजितसिंह पाटील हे मुख्याधिकारी व नागरिक यांच्या समवेत बैठक घेणार आहेत. या आराखड्यामध्ये उद्यान विकसित करणेस्वच्छतागृहेघनकचरा व्यवस्थापनविद्युतीकरणभुयारी गटारपाणी पुरवठा या कामांचा समावेश असणार आहे.

 
Top