तुळजापूर प्रतिनीधी :- तालुक्यातील काक्रंबा येथे  भरदिवसा  अज्ञात  चोरट्यांनी  घरात कुणीही नसल्याची संधी साधुन घरात प्रवेश करुन   घरातील कपाटाचे कुलप तोडुन  दागिने सह लाखो रुपयाची रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवार दि१८रोजी दुपारी १२.३०वा सुमारास घडली. काक्रंबा येथील संदीप चौघुले  व प्रशांत चौघुले हे बंधु  अर्धवट पुलाजवळ घरी राहतत यात संदीप चौघुले व,त्यांची पत्नी हे फिरण्यासाठी परराज्यात गेले असुन प्रशांत ची मंडळी आजारी असल्याने  दवाखान्यात असल्याने  घरात कुणीही नसल्याचे  पाहुन   चोरट्यांनी घरात प्रवैश करुन कपाटचा लाँक तोडुन  आतील सोने दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. चोरी घडताच तात्काळ    पोलिस घटनास्थळी दाखल झाले  घटनास्थळि फाँरेसिंक लँब पथक व विविध  पथक येवुन पाहणी .केली  सदरील चोरी ही पाळत ठेवुन केली असल्याचे वृत्त आहे

चोरट्यांचे चेहरृ सीसीटीव्हीत अस्पष्ट ! सदरील चोरी चे दृश्य शेजारील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत  यात दोन चोरट्यांनी दोन मोटार सायकल वर येवुनअवघा काही मिनीटित घरात घुसुन घरातुन सोने दागिने व रोख रक्कम कपड्यात गुंडाळून दोन मोटार सायकल वरुन लातुर कडे पळुन गेल्याचे माञ सीसीटीव्ह फुटेज  मध्ये  चोरट्यांचे चेहरे  स्पष्ट  दिसत नसल्याने पोलिसांच्या तपासावर मर्यादा येत  आहेत

 
Top