धाराशिव / प्रतिनिधी-

 धाराशिव शहर व जिल्ह्यातील वर्ग एकच्या जमिनी वर्ग दोनमध्ये केलेल्या आहेत. त्या वर्ग एक मध्ये करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे ठाम आश्वासन पालकमंत्री सावंत यांनी दिले. दरम्यान, वर्ग एकच्या जमिनी वर्ग दोनमध्ये जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतल्यामुळे जिल्हावासियांवर अन्याय झाला असून त्या पुन्हा वर्ग एक मध्ये वर्ग करण्यात याव्यात, अशी मागणी धाराशिव जिल्हा शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीच्यावतीने पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. त्यावेळी मंत्री सावंत यांनी वरील आश्वासन दिले.

दिलेल्या नियोजनात असे नमूद करण्यात आले आहे की, दि.१ मे रोजी विधान भवनाच्या बैठक कक्षामध्ये वर्ग दोनच्या जमिनी व सिलिंग जमिनी एकमध्ये रूपांतरित करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

त्या बैठकीमध्ये वर्ग एकच्या जमिनी व सिलिंगच्या वर्ग दोनमध्ये रूपांतरित करण्याचे फक्त धाराशिव जिल्ह्यामध्येच निर्णय घेण्यात आला. हा निर्णय महाराष्ट्र राज्यामध्ये कोठेच घेतलेला नसताना हा निर्णय प्रशासनास घेण्यास कोणी भाग पाडले किंवा कोणाच्या दबावाखाली घेण्यात आला ? वर्ग एकच्या जमिनी व सिलिंग वर्ग दोनमध्ये रूपांतरित करण्याचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे काय ? त्याचा निर्णय झाला असेल तर मला त्याची प्रत देण्यात यावी असे सर्व समक्ष सभागृहात विखे पाटील यांनी सांगितले होते. त्यावेळी प्रशासन निरुत्तर झाले. त्यावर महसूल मंत्री विखे पाटील यांनी आपण केलेल्या संभाषणावर विचार करून व सभागृहाचा आदर करून वर्ग दोन केलेल्या जमिनी लवकरच वर्ग एकमध्ये करण्यात येईल असे आश्वासन दिलेले असताना व आपण वेळोवेळी कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चा करून सोडविण्यासाठी आपण आजपर्यंत प्रयत्न केलेले आहेत. तसेच धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकापर्यंत हा विषय मंत्री सावंत यांनी मंजूर करण्याच्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न केले, अशी चर्चा सुरू आहे. परंतू अद्यापपर्यंत हा निर्णय झालेला नसल्यामुळे हा विषय आपल्याशिवाय मार्गी लावणे अशक्य असून हा विषय लवकरात लवकर निघाली काढण्यासाठी विखे पाटील यांना आपल्या स्तरावरून वर्ग दोनच्या जमिनीवर एकमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच सर्व शेतकरी, प्लॉटधारक यांची मागणी पूर्ण करावी, अशी मागणी केली आहे. यावर धाराशिव जिल्हा शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, माजी उपनगराध्यक्ष अतुल बागल महादेव लिंगे उमेश राजे संजय पवार अभिजीत पवार आदींसह अराजकीय कृती समितीच्या सदस्यांच्या सह्या आहेत.


 
Top