तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील जिल्हा परिषद शाळेतील  १९८३ च्या दहावीच्या बॅच चे माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यानिमित तब्बल ४०  वर्षानंतर  दि . ३० रोजी एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.      

प्रारंभी श्रीतुळजाभवानी व सरस्वती पुजन गुरुवर्य ग्रंथमहर्षी व,ग सुर्यवंशी एम ऐ कांबळे यांच्या हस्ते करण्यात येवुन झाला नंतर गुरुजनचा सत्कार करण्यात आला .

या नंतर आपल्या शाळेसाठी १९८३च्या बँचच्या विध्यार्थींनी शाळेची गरज ओळखुन ३६इंची तीन टीव्ही भेट मुख्याध्यापक स्वामी व सर सोनवणे यांच्या कडे देवुन आणखी मदत करण्याचे आश्वासन दिले व शाळेप्रति आपली सेवावृत्ती भावना दाखवुन दिली.राज्यपुरस्कार प्राप्त कृषीभूषण शेतकरी, प्राचार्य, प्राध्यापक , अभियंता, सरपंच , पञकार,  व्यावसायिक , उद्योगपती बनलेले हे सगळं विसरून आपल्या बालपणातील मैत्रीत रममाण झाले होते.

 .. हे माजी विद्यार्थी शाळेच्या  त्याच बाकड्यावर बसले.व  अत्यंत हृदयस्पर्शी हा क्षण जुन्या  उत्कट भाव भावनांनी दाटून आला होता. त्यानंतर  माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेह मेळावा पाहून गुरुजनांचा उर अभिमानाने भरून आला. दिलेल्या ज्ञानाचे फळ सार्थकी लागले .अशी सार्थ अभिमानाची भावना कौतुकाच्या थापेत दिसून आली.

यावेळी ट्रेझरी आंफीसर प्रशांत तातोडे अभियंता संजय जेवळीकर  किशोर हंगरगेकर धन्यकुमार पेंदे नागेश नाईक राजेंद्र खेंदाड बाळासाहेब जाधव विकास ठोंबरे भास्कर देशमुख  सह  अनेक माजी विध्यार्थींनी आपल्या संघर्षमय जीवन गाथा सांगितली. 

  .या मेळाव्यात राज्यातुन तब्बल पंचेचाळीस  माजी विध्यार्थी सहभागी झाले . प्रारंभी आपल्याला शिकवलेले जे गुरुजन आपल्यात  नाहीत अशा गुरुजंणाना व सहकारी मिञांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

गुरुजणांचा सत्कार श्रीकांत कदम चाँदपाशा शेख यांनी केला माजी विध्यार्थीं नवनाथ पांडागळे सेवानिवृत्त झाल्या बद्दल त्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.शाळेने विध्यार्यांना सन्मान पञ देवुन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास ठोंबरे नी केले आभार नागेश नाईक यांनी मानले

या कार्यक्रम यशस्वी ते साठी नागेश नाईक भास्कर देशमुख श्रीकांत कदम संजय जेवळीकर खालेद सिध्दीकी अभय कुलकर्णी धन्यकुमार पेंदे शशीकांत क-हाडे विजय कदम बाबुराव शेळके लक्षमण खोले नागेंद्र पुरी चंद्रशेखर मिरगणे नेताजी कदम शशीकांत पाटील किशोर शिंदे अदिनी परिश्रम घेतले.


 
Top