नळदुर्ग / प्रतिनिधी-

  गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कर्मचारी संघटना कंत्राटी धाराशिव यांनी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केले, मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिले परंतु कुठल्याही प्रकारच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे अखेर एक मे महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कर्मचारी संघटना कंत्राटी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे, दिनांक २८ एप्रिल रोजी जिल्हा क्षयरोग अधिकारी धाराशिव यांना दिलेले निवेदनात असे म्हटले की राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून याबाबत वारंवार पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,  आरोग्य मंत्री यांना निवेदन दिले तसेच प्रत्यक्ष भेटून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकरिता विनंती केली होती परंतु आश्वासन देऊनही  कोणत्याच मागण्या पदरात पडल्या नाहीत, असे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे .परिणामी नाईलाजास्तव कर्मचारी संघटनेने १ मे २०२३ या  महाराष्ट्र दिनी लेखणी बंद आंदोलन व इतर अहवाल बंद करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केल्यामुळे जिल्हा क्षयरोग केंद्रातील कामे थांबली आहेत, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना मानधनात ४० टक्के वाढ करण्यात यावी ,कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना ईपीएफ त्वरित लागू करावा, संसर्गजन्य आजारामध्ये काम करीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता ५००० प्रति महिना त्वरित लागू करण्यात यावा, कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचा मृत्यू किंवा अपघात झाल्यास शासनाकडून सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात यावे, मृत्यू व अपघात झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात यावी, इंधन भत्ता व प्रवास भत्ता मध्ये  मागील पंधरा वर्षापासून कोणतीही वाढ शासनाकडून करण्यात आलेली नाही तरी त्यात शंभर टक्के वाढ त्वरित लागू करावी,


 
Top