धाराशिव / प्रतिनिधी-
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ लवकरच घेण्यात येणार आहे.  राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांना कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी या सोहळ्याचे निमंत्रण दिले तसेच विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवालही सादर केला . 
     महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी सर्व कुलगुरूंची आढावा बैठक सोमवारी (दि. १५ ) राजभवनात घेतली. मा.कुलपती यांनी फेब्रुवारी महिन्यात सुत्रे स्विकारली. त्यानंतर सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी त्यांनी पहिल्यांदाच संवाद साधला.दीक्षांत समारंभात पाहुण्यांच्या हस्ते पीएच.डी पदवी प्रदान करुन घेण्यासाठी चारही विद्याशाखांतील संशोधकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. या सोहळ्याचे पाहुणे लवकरच ठरविण्यात येणार असून आयोजनाची जय्यत तयारी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने सुरू असल्याची माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली . 
नवीन विद्यापीठाचे काय 
महाविकास आघाडी सरकारच्या काळात धाराशिव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे पुर्ण विद्यापीठात रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यासाठी एक कमिटी ही नेमण्यात आली होती. पुर्ण विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी तत्कालीन सिनेट मेंबर संजय निंबाळकर यांनी उपकेंद्रात अनेक विभागाच्या इमारती उभ्या केल्या आहेत. त्यामुळे नवीन विद्यापीठ निर्मिती सहज शक्य असून त्यासाठी भाजप-शिवसेना नेत्यांनी प्रयत्न करने गरजेचे आहे. व आपल्या कार्य कतृत्वाची छाप पाडणे आवश्यक आहे. 

 
Top