उमरगा / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे यंदाचे राज्यस्तरीय अधिवेशन २७ व २८ मे रोजी बारामती येथे होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी दिली आहे.                                                    

  गेल्यावर्षी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे दोन दिवशीय अधिवेशन महाबळेश्वर येथे झाले होते. यंदाचे दोन दिवशीय अधिवेशन बारामती क्लब या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील पुणे ,नागपूर , अमरावती , नाशिक , संभाजीनगर , कोल्हापूर , मुंबई , लातूर सह कोकण विभागातील  हिंदी अध्यापक या अधिवेशनात सहभागी होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित दादा पवार यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. दामोदर खडसे भूषविणार असून याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई येथील आय पीओ एस मा. पांडुरंग चोरमले उपस्थित राहणार आहे याप्रसंगी संघाचे कार्याध्यक्ष प्रा. सुंदर लोंढे , सचिव रेवणनाथ कर्डिले अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांचीही उपस्थिती राहणार आहे.                                    या अधिवेशनात हिंदीचा प्रचार प्रसार करणे तसेच इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम,कृतीपत्रिका आदी विषयांवर चर्चा होणार आहे. यावेळी राज्य विभाग व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.    या  दोन दिवसीय अधिवेशनासाठी राज्यातील तसेच जिल्ह्यातील हिंदी अध्यापक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हिंदी संघाचे विभागाध्यक्ष प्रा.लक्ष्मणनाईक, व सचिव प्रा. किरण दंडीमे यांनी केले आहे .


 
Top