धाराशिव/ प्रतिनिधी 

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात जी 20 अंतर्गत एकदिवशीय कार्यशाळेत उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख बोलत होते. सध्याच्या आधुनिक काळामध्ये माणूस यंत्रवत होत चालला आहे.माणसाची जीवनशैली ही पर्यावरण पूरक असली पाहिजे, त्याचबरोबर ऊर्जा पाणी या स्त्रोतांचे संवर्धन योग्य प्रकारे केले पाहिजे. वीज पाणी इत्यादी श्रोतांचा काटकसरीने वापर केला पाहिजे. या ज्वलंत विषयाची जागृती करण्यासाठीच अशा प्रकारच्या कार्यशाळा अत्यंत महत्त्वाच्या आहेत असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांनी केले .

   सदर कार्यशाळा दोन सत्रामध्ये संपन्न झाली. प्रथम सत्रामध्ये साधन व्यक्ती म्हणून प्रा. डॉ . कुणाल वणंजे हे बोलत होते. ते म्हणाले की, अनावश्यक ऊर्जेचा वापर टाळणे काळाची गरज ठरली आहे. पहिला सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे विभाग प्रमुख प्रा . डॉ. एस एस फुलसागर हे लाभले होते. अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्रा.डॉ . फुल सागर म्हणाले की, सध्याचा काळ खूप कठीण असला तरी योग्य नियोजन करून या कठीण काळावर मात करता येऊ शकते. त्यामुळे उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा पर्याप्त वापर होणे गरजेचे आहे.

     दुसऱ्या सत्रातील साधन व्यक्ती म्हणून प्रा. सचिन चव्हाण हे लाभले होते . त्यांनी व्यक्तीची जीवनशैली पर्यावरण पूरक असली पाहिजे, त्याचबरोबर प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. कार्यालयामध्ये घरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर कमीत कमी करावा असे प्रतिपादन केले. दुसऱ्या सत्रात अध्यक्ष म्हणून प्रा. श्रीराम नागरगोजे लाभले होते. या वेळी त्यांनी पर्यावरणाचे महत्व पटवुन दिले.

  समारोप समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी.एस.सूर्यवंशी हे होते. त्यांनी मनोगत व्यक्त करताना पर्यावरणाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन केले.

    सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यशाळेचे समन्वयक प्रा.डॉ. जीवन पवार यांनी केले. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद या विद्यापीठाच्या निवडक वीस महाविद्यालयाला ही कार्यशाळा महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाचा सहभाग आहे ही अभिमानाची बाब आहे.प्रस्ताविकामध्ये त्यांनी कार्यशाळा घेण्या पाठीमागचा उद्देश स्पष्ट केला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.माधव उगिले यांनी केले तर आभार प्रा. डॉ. संदीप देशमुख यांनी मानले.  समारोप समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.माधव उगले यांनी केले तर आभार प्रा. डॉ. मारुती अभिमान लोंढे यांना मानले.    सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.   सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.


 
Top