धाराशिव / प्रतिनिधी-

 पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांचे सकंल्पनेतुन धारशिव शहर पोलीस ठाणे आयोजीत सामाजिक सलोखा चषक, उस्मानाबाद स्पर्धेचे आयोजन उस्मानाबाद जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या 2 नंबर  कवायत मैदानावरती करण्यात आले ओह.या मध्ये धारशिव शहरातील  डॉक्टर, वकील, तसेच ग्रामीण भागातील असे एकुण 16 संघ सहभागी झाले आहेत.या मध्ये प्रथम क्रंमाक याणाऱ्यास प्रथम पारितोषीक 41,000/- व्दितीय पारितोषिक 21,000/-, तृतीय पारितोषिक 11,000/- असे आयोजन करण्यात आले आहे. सदर समारंभचे उद्घाटन  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले.

  सदर कार्यक्रमास पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी,  धाराशिव शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी उस्मान शेख, सपोनि   चव्हाण, भराटे, स्थानिक गुन्हे शाखेचे  सपोनि निलगेंकर, पोउपनि   ओहोळ,  संयोजक बालाजी काटकर, परम जाधवर, विजय कांबळे, महादेव शिंदे, सचिन स्वामी, शशिकांत जाधवर,डान्सिंग पंच सोन्या बापु भोसल यांच्यासह जिल्हा पोलीस दलातील अधिकारी- अंमलदार उपस्थितीत होते. 


 
Top