धाराशिव/ प्रतिनिधी 

 धाराशिव जिल्ह्यातील एकूण 24 ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या  धाराशिव तालुक्यातील देवळाली आणि पिंपरी, तुळजापूर तालुक्यातील चिवरी, कळंब तालुक्यातील गंभीरवाडी, मलकापूर आणि देवळाली तसेच परंडा तालुक्यातील आलेश्वर या गावातील निवडणूक दि.18 मे रोजी होणार असून दि.19 मे 2023 रोजी मतमोजणी कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे.

 महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाचे उपायुक्त यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र मद्य निषेध कायदा 1949 नुसार मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर म्हणजेच दि.16 मे रोजीच्या सायंकाळी 6.00 वा.पासून ते दि.19 मे 2023 रोजीच्या मतमोजणीचा संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत सर्व अबकारी अनुज्ञप्त्यांचे मद्य विक्रीचे व्यवहार पूर्णत: बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आदेशित केले आहे.

  या आदेशाचे अनुज्ञप्तीधारकांनी काटेकोरपणे पालन करावे. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करतील त्यांच्याविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54(1)(सी) नुसार तसेच अनुषंगिक नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

 
Top