सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश येणार

धाराशिव / प्रतिनिधी-

वकीलांचे प्रश्न, न्याय व्यवस्थेचे आधुनिकीरण व लोकांना गतीने न्याय मिळावा ई-फायलींग आदी विषयावर चर्चा करण्यासाठी  धाराशिव येथे पाच मे ला राज्यस्तरीय वकील परिषद प्रथम होत आहे, अशी मािहती  महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष अॅड मिलींद पाटील  यांनी दिली. यावेळी  धाराशिव वकील मंडळाचे अध्यक्ष सुधाकर मुंडे उपस्थित होते. 

अॅड. पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार या राज्यस्तरीय वकील परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणुन  सुप्रीम कोर्टाचे  न्यायमुर्ती भुषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मराठवाड्याचे भुमीपूत्र न्यायमुर्ती एस.व्ही. गंगापुरवाला, कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती प्रसन्न वैराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती नितीन सांब्रे, न्यायमुर्ती आरूण पेंडणेकर, न्यायमुर्ती आर.सी.चव्हाण, अॅडीशन सॉलीसीटर जनरल ऑफ इंडिया अिनल सी.सिंह, अॅडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र डॉ.बिरेंद्र सराफ, चेअरमन बार कौन्सल ऑफ इंडिया मन्ननकुमार िमश्रा, माजी न्यायामुर्ती व्ही.के.जाधव, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग अध्यक्ष न्यायमुर्ती सुरेद्र तावडे, प्रमुख जिल्हा न्यायाधिश अंजु एस. शेंडे यांच्या उपस्थितीमध्ये दिवसभरात तीन सत्रात ही परिषद होणार आहे. 

जिल्हयाचा वकीलांचा वारसा समृध्द आहे. जुन्या पिढीतील अॅड. मल्लिकार्जुन तोडकरी, अॅड. फुलचंद गांधी, उच्च  न्यायालयाचे न्यायमुर्ती बी.एन.देशमुख, न्यायमुर्ती पी.बी.गायकवाड, न्यायमुर्ती के.एन.वडणे याच बरोबर अॅड. व्यंकटराव नळदुर्गकर, भाई उद्धवराव पाटील, अॅड. नरसिंगराव देशमुख यांनी खासदारकी भुषविली. त्याचप्रमाणे अॅड. कलमोद्दीन सिद्दीकी, अॅड. खलिकमियाँ काझी यांनी ही राजकीय क्षेत्रात नाव गाजवले आहे, असे सांगून मिलींद पाटील यांनी  सर्व जिल्हा व तालुक्याच्या न्यायालयास ई-फायलींगसाठी कॉम्प्युटर, स्कॅनर, प्रिंटर वकील मंडळाच्या वतीने भेट देणार असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेस अॅड. रामभाऊ गरड, अॅड प्रताप देवळे, अॅड. नितीन भोसले, अॅड. ललित चौधरी आदी उपस्थित होते.  


 
Top