सोलापूर/ प्रतिनिधी-

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक   नरेश लालवाणी यांनी मध्य रेल्वेच्या  5 कर्मचाऱ्यांना 'महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार' प्रदान केले, ज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर विभागातील प्रत्येकी 1 आणि सोलापूर विभागातील 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात, कर्तव्याच्या ओळीत त्यांची दक्षता, एप्रिल 2023 मध्ये अनुचित घटना टाळण्यात त्यांचे योगदान आणि रेल्वे संचलनातील योगदानाची दखल घेऊन

सोलापूर मंडळ   राजाराम घोडके, पॉइंट्समन, बाळे /सोलापूर विभाग, 03.03.2023 रोजी कर्तव्यावर असताना, क्रॅंक हँडल चाचणी करून परत येत असताना, OHE चे सेक्शन इन्सुलेटर तुटलेले आढळले. त्यांनी तत्काळ सर्व संबंधितांना माहिती दिल्यानंतर पॉवर ब्लॉक घेऊन बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि कामाबद्दलच्या गांभीर्यामुळे संभाव्य भीषण अपघात टळला.

श्रीमती सरस्वती मलप्पा, तकनीशियन, वाडी/सोलापूर विभाग, 24.03.2023 रोजी कर्तव्याच्या ओळीत रोलिंग चाचणी दरम्यान, वाडी स्थानकावर आलेल्या मालगाडीच्या वॅगनचा सीटीआरबी कप तुटलेला आढळून आला. सर्व संबंधितांना कळवल्यानंतर सदर वॅगन सेवेतून मागे घेण्यात आली. त्यांच्या उपस्थितीमुळे मोठी दुर्घटना टळली.

  आलोक सिंग, अतिरिक्त महाव्यवस्थापक,   एम एस उप्पल, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी,   राजेश अरोरा, प्रधान मुख्य अभियंता,   मुकुल जैन, प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक,   एन पी सिंग, प्रधान मुख्य विद्युत अभियंता,   सुनील कुमार, प्रधान मुख्य यांत्रिकी यावेळी मध्य रेल्वेचे अभियंते आणि इतर प्रमुख एचओडी उपस्थित होते आणि सर्व विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक या कार्यक्रमात वर्चुअली सहभागी झाले होते.

 
Top