धाराशिव/ प्रतिनिधी  

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात दिनांक 1 मे 2023 रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बापूजींनी उस्मानाबाद सारख्या मागास भागात महाविद्यालय सुरू केले नसते तर आपण जे समोर सुस्थितीमध्ये असणारे माजी विद्यार्थी आहात ते या सुस्थितीमध्ये दिसले नसते. आपण मोठमोठ्या पदावर काम करत आहात ते केवळ बापूजींच्या पुण्याइमुळेच,बापूजींनी खूप मोठा संघर्ष केला. आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षण घेत असताना त्यांना काम करावे लागले. अशा प्रकारचे विविध दाखले देऊन अंगावर रोमांच आणणारे प्रसंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगत आणि माजी विद्यार्थी म्हणून बोलताना प्रतिपादन केले, ते पुढे म्हणाले की, मी खूप मोठा भाग्यवान आहे,माझ्या वयाची केवळ सोळा वर्ष मी संस्थेच्या बाहेर होतो . वयाच्या सतराव्या वर्षापासून ते आज तागायत मी संस्थेमध्ये शिक्षण आणि सेवा करत आहे. याबध्दल मी समाधानी आहे. रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे असे एकमेव महाविद्यालय आहे की, ज्या महाविद्यालयाला डी.बी.टी. स्टारचा दर्जा आहे. महाविद्यालयाच्या मूल्यांकन वाढीसाठी माजी विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण महाविद्यालयात वारंवार येऊन मार्गदर्शन करण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. देशमुख यांनी केले 

    याप्रसंगी महाविद्यालयाचे पहिले विद्यार्थी श्री नानासाहेब पाटील हे  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचा प्रवास कथन केला. आणि महाविद्यालयाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा. डॉ. विष्णू वाघमारे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी  

प्रा. डॉ.नितीन पडवळ, (प्राणीशास्त्र विभागप्रमुख, शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय भूम), प्रशांत राजहंस(अजंता फार्म औरंगाबाद),प्रा. बबन खामकर (साहेबराव हंगरगेकर कनिष्ठ महाविद्यालय हंगरगा) ,श्री विनोद लांडगे ( विशेष शिक्षक नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय खानापूर ),बालाजी तांबे (राज्यकोषाध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक संघ), प्रा. नंदकुमार नन्नवरे (श्रीपतराव भोसले जुनियर कॉलेज उस्मानाबाद), श्री कुंभार सर (छत्रपती शिवाजी हायस्कूल उस्मानाबाद), श्री पी व्ही आगळे माजी मुख्याध्यापक, संत ज्ञानेश्वर विद्यालय लासोना.इत्यादी माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि महाविद्यालयाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

   कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. केशव क्षीरसागर यांनी केले,सूत्रसंचालन डॉ. वैभव आगळे यांनी केले, तर आभार प्रा.श्रीराम नागरगोजे यांनी मानले.        सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top