धाराशिव / प्रतिनिधी-

 शेतात वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या तालुक्यातील सारोळा येथील तरूण शेतकऱ्याच्या कुटूंबियांसाठी शासन आणि प्रशासन धावून आले आहे. तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी तत्परता दाखवत मयताच्या वारसाला नैसर्गिक आपत्तीमधून तातडीने चार लाख रूपयांचा धनादेश दिला आहे.

सारोळा येथे नायब तहसीलदार स्वप्निल ढवळे व सरपंच निर्मलाताई चंदणे यांच्या हस्ते बुधवारी (दि.3) मयताची आई शारदा गाडे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथील सागर बळीराम गाडे हा 28 एप्रिल रोजी रात्री मामाच्या शेतात काही कामानिमित्त गेला होता. शेतातच आंब्याच्या झ्ााडाखाली तो जेवण करत होता. मात्र अचानक वादळी वाऱ्यासह पाऊसाचे आगमन झ्ााले आणि यातच वीज कोसळून सागर याचा जागेवरच दुर्देवी मृत्यू झ्ााला. दूर्देवाची बाब म्हणजे पाच महिन्यापूर्वीच सागरच्या वडिलांचाही मृत्यू झ्ााला होता. त्यामुळे गाडे कुटूंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला. त्यामुळे गाडे कुटूंबियांना शासन-प्रशासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. शासन आणि प्रशासनाने मयत सागरच्या वारसांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. भाजप-शिवसेना सरकार आणि धाराशिव तहसिल कार्यालयाच्या गतीमान कारभारामुळे सागर याची आई शारदा यांच्याकडे नैसर्गिक आपत्तीमधून तातडीने चार लाख रूपयांचा धनादेश घरी जावून सुपूर्द करण्यात आला. तसेच नायब तहसीलदार श्री. ढवळे यांनी प्रशासन आपल्या सोबत असल्याची ग्वाही दिली. यावेळी विनोद बाकले, नितीन चंदणे, मंडळ अधिकारी दत्ता कोळी, तलाठी विश्वास वायचळ, कामेगावचे तलाठी सतीश निंबाळकर, शंकर गाडे, बालाजी सोनटक्के, बाळासाहेब मुजावर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top