धाराशिव / प्रतिनिधी-

लोककल्याणकारी, रयतेचा राजा छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती शिंगोली आश्रम शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली.  कार्यक्रमाचे अध्यक्ष चित्तरंजन राठोड, प्रमुख पाहुणे कुमंत शिंदे व पर्यवेक्षक शेख अब्बास अली यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. 

पर्यवेक्षक शेख अब्बास अली यांनी लोक कल्याणकारी, रयतेचा राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या बद्दल माहिती दिली. शिक्षण, कृषी, सहकार, क्रीडा, संगीत, कला, नाट्य, साहित्य, तंत्रज्ञान यासाठी राज्यश्री शाहू महाराजांनी भरीव कामगिरी केली. बहुजन समाजातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी त्यांनी वस्तीगृह उभा केली. अशा या थोर राजाचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून आपला भारत देश बलशाली करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे आव्हान त्यांनी केले. 

कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होती. शिक्षक रत्नाकर पाटील, सूर्यकांत बर्दापुरे, जाधव चंद्रकांत, पडवळ खंडू, दीपक खबोले, कैलाश शानिमे, मल्लिनाथ खोंदे, मदनकुमार आमदापुरे, विशाल राठोड, सचिन राठोड, प्रशांत राठोड, सतीश कुंभार, व्यवहारे व शितोळे मॅडम, कर्मचारी बबन चव्हाण, रेवा चव्हाण, सचिन माळी, अविनाश घोडके, अमोल जगताप, मस्के मामा, गोविंद बनसोडे, वसंत भिसे इत्यादी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुरेखा कांबळे मॅडम व आभार श्रद्धा सूर्यवंशी मॅडम यांनी मानले.

 
Top