धाराशिव / प्रतिनिधी|
८जानेवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या सैनिकी स्कूल परीक्षेमध्ये जि.प.आदर्श कन्या तडवळे शाळेचे उतुंग यश. 4 विद्यार्थीनींची निवड झाली आहे.
नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा या दोन परीक्षेतील यशासाठी सुप्रसिद्ध असणारी शाळा जिल्हा परिषद आदर्श कन्या प्राथमिक शाळा कसबे तडवळे शाळेने ऑल इंडिया सैनिकी स्कूल परीक्षेमध्ये ही यशाचे शिखर गाठले आहे . १.कुमारी माधुरी सूर्यकृष्ण पवार-CHHINGCHIP गुजरात २.कुमारी दिव्या अशोक करंजकर- नेताजी सुभाष चंद्र बोस मिलिटरी स्कूल सिल्वासा. ३.कुमारी संस्कृती सत्यवान म्हेत्रे नेताजी सुभाष चंद्र बोस मिलिटरी स्कूल सिल्वासा ४ कुमारी श्रेया नितीन अडसूळ - एस.के. इंटरनॅशनल स्कूल सांगली . या चार विद्यार्थिनींची निवड झाली आहे . जिल्हा परिषदेच्या शाळेमधून सैनिकी स्कूल परीक्षेसाठी मुलींची निवड होणारी ही एकमेव शाळा ठरली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समिती कडून फेटा पुष्पहार व पेन देऊन करण्यात आला सैनिकी स्कूल साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे या विद्यार्थ्यांनीना मार्गदर्शन धायगुडे सर ,सय्यद सर सह आदी शिक्षकांचे मिळाले आहे तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा . राहुलजी गुप्ता . शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीमती. सुधा साळुंखे मॅडम गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद ,तेरणानगर बीटच्या विस्ताराधिकारी श्रीमती.किशोरी जोशी ,केंद्रप्रमुख श्री . जगदीश जागते , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष व सर्व सदस्य व गावातील शिक्षण प्रेमी नागरिकांतून विद्यार्थिनींचे कौतुक केले जात आहे .