धाराशिव / प्रतिनिधी-,

 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात लोकराजाराजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी सांगता समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. विकास सरनाईक प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

 सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 याप्रसंगी डॉ. विकास सरनाईक म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनी पेरलेले सामाजिक व शैक्षणिक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनाबद्ध केले.त्याचाच परिणाम म्हणून स्वातंत्र्योत्तर काळामध्ये बहुजन समाजाचा झालेला विकास आपल्याला दिसून येतो.शाहूंनी ज्या सुधारणांचे बीज रोवले होते त्याचेच आज वटवृक्षात रूपांतर होऊन बहुजन समाजातील अनेक व्यक्ती आज उच्च पदावर विराजमान झालेल्या दिसून येतात. हेच त्यांच्या कार्याचे फलित असल्याचे दिसून येते.त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा आजच्या तरुण पिढीने आत्मसात करून प्रत्यक्षात राबवणे काळाची गरज आहे.

    या कार्यक्रमाचे अध्यक्ष कनिष्ठ विभागाचे उप प्राचार्य श्री बबन सूर्यवंशी हे होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. माधव उगिले यांनी केले ,तर सूत्रसंचालन डॉ.वैभव आगळे यांनी केले, आभार कनिष्ठ विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री पी. डी.क्षिरसागर यांनी मानले.    सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top