धाराशिव / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंह  पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे  इर्ला, ता.धाराशिव येथे   करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात इर्ला व परिसरातील सर्व वयोगटातील ६०० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन  वि. का. सो. चेअरमन चागदेव क्षिरसागर यांच्या हस्ते झाले  या वेळी प्रमुख पाहुने सरपंच पाडुरंग पाटील, उपसरपंच प्रविन क्षिरसागर, तंटामुक्ती अध्यक्ष बजरंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य नंदकिषोर क्षिरसागर, ज्ञानेश्वर चौरे, विशाल वाघमारे, रामचंद्र चौरे, बालाजी  काबंळे, आजमेर कादरसे, भास्कर चौरे, किषोर क्षिरसागर, रविंद्र काबंळे, इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.‍ अजित निळे, डॉ.स्नेहा अंतुरे, डॉ.पंकज बागुल, डॉ. प्राजकता शेटे, डॉ. दामिनी पुरी, डॉ. जयेश भायेकर यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे आमिन सय्यद, विनोद ओव्हाळ, निशिकांत लोकरे, संदिप खोचरे,  व आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या डॉ. थावरे, डॉ. अंकुरे, सुरज मगर, मोमीन टी.ए, माळी .व्ही. ए. व आशा कार्यकर्त्या व ललीता वाघमोडे, भाग्यश्री क्षिरसागर, बालीका भालेराव व गट प्रवर्तक संगिता डोलारे यांनी परीश्रम घेतले.

 
Top