धाराशिव / प्रतिनिधी-

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील कारखान्याला घातलेल्या ऊसाची पहिले रक्कम अद्याप दिलेली नाही. ती रक्कम येत्या आठ दिवसात देण्यात यावी, यासाठी संबंधित कारखान्याच्या चेअरमनसह संचालक मंडळास सुचित करावे, अन्यथा आपण तीव्र आंदोलन करु, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील साखर कारखान्याकडे ऊस पुरवठा केला आहे. साखर कारखाने बंद होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. एवढा कालावधीत जाऊनही जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिलाची पहिली उचल अद्यापपर्यंत दिलेली नाही. पहिली उचल न दिलेल्या साखर कारखान्यांना उसाचे पहिले बिल येत्या आठ दिवसात देण्यासंदर्भात संबंधित कारखान्याचे चेअरमन व संचालक यांना सुचित करावे. शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल आठ दिवसात न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात   दिला आहे.


 
Top