धाराशिव /प्रतिनिधी -

शहरातील धाराशिव जनता बँकेच्या कार्यालयात प्रति मराठीवर्षा प्रमाणे देवगिरी प्रांत संस्कार भारती जिल्हा समिती निर्मित छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक ३५० वे वर्ष, संस्कार भारती समिती संस्थापक पद्मश्री स्व. बाबा योगेंद्र जी जन्मशताब्दी वर्ष तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष अनुसरुन विषयानुरूप दैनंदिनी २०२३ - २४ चे विमोचन धाराशिव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष हभप वसंत नागदे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

 याप्रसंगी देवगिरी प्रांत सह चित्रकला विधाप्रमुख तथा जिल्हा मार्गदर्शक शेषनाथ वाघ ,जिल्हाकार्याध्यक्ष अनिल ढगे , जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हा कोषप्रमुख अरविंद पाटील, जिल्हा संगीत विधाप्रमुख सुरेश वाघमारे, नाट्यविधा प्रमुख धनंजय कुलकर्णी, संयोजन समिती अध्यक्ष शरद वडगावकर,मुकुंद पाटील मेंढेकर , मंगेश वैजापूरे , धनंजय जेवळीकर उपस्थित होते . समाजात सध्यास्थित आधुनिकीकरण प्रगती , धकाधकीच्या जीवनात परंपरा , संस्कार , संस्कृतीचा विसर पडत चालला आहे . समाजास सध्यस्थितीत संस्कारक्षम होण्याची गरज आहे . त्यामुळे आपण संस्कार भारती समितीच्या माध्यमातून समाज संस्कारक्षम बनविण्यासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष प्रत्यन करावा हभप वसंत नागदे यांनी मनोगत व्यक्त  केले. विमोचनात धाराशिव जनता बँकेचे संचालक आशीष मोदाणी, उद्योजक संजय पटवारी यांनाही दैनंदिनी देण्यात आली. सुत्रसंचलन धनंजय कुलकर्णींनी केले तर आभार श्यामसुंदर भन्साळींने मानले.

 
Top