धाराशिव / प्रतिनिधी-

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त स्वजनहित सामाजिक बहुउद्देशीय संस्था, धाराशिव व युवा आधार प्रतिष्ठान धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

   या स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यग्रह धाराशिव या ठिकाणी घेण्यात आल्या या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात स्पर्धे मागचा हेतू सांगताना शालेय,विद्यालयीन-महाविद्यालयीन युवक-युवतींना त्यांच्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळावा व बाबासाहेबांच्या विचारांची शिदोरी सातत्याने युवा पिढी सोबत असावी. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर व्हावा या अनुषंगाने व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते असे सांगीतले.

     या स्पर्धेत राज्यभरातून 50 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचे दोन गटांमध्ये विभाजन करण्यात आले होते शालेय गट व विद्यालय महाविद्यालयीन गट असे विभाजन करण्यात आले होते तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या वतीने शालेय गटाला प्रथम पारितोषिक 11000 रूपये व महाविद्यालयीन गटाला प्रथम पारितोषिक 11000 रूपये, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन जी काळे यांच्या वतीने शालेय गट द्वितीय पारितोषिक 7000 रूपये व महाविद्यालयीन गटाला द्वितीय पारितोषिक 7000 रूपये, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप शिंदे यांच्या वतीने शालेय गट तृतीय पारितोषिक 5000 रुपये,भाजपा नेते प्रमोद पाटील यांच्या वतीने महाविद्यालयीन गटाकरिता तृतीय पारितोषिक 5000 रुपये त्याचप्रमाणे दोन्ही गटाला उत्तेजनार्थ पारितोषिक दशरथ उर्फ चिंटू पाटील यांच्या वतीने 5000 रुपये देण्यात आले.

     सायंकाळी 5:00वाजता बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.शालेय गटात अतिशय चुरस झाल्याने सर्व बक्षीस विभागून देण्यात आले शालेय गटातील प्रथम पारितोषिक कु.वसुंधरा संजय गुरव इ.6वी धाराशिव, कु. श्रविका संपत जाधव इ.8वी बार्शी, द्वितीय पारितोषिक कु.यशराज आप्पा हेगडे इ.8वी सातारा,कुमारी अजित यादव इ.9वी धाराशिव,तृतीय पारितोषिक कु.आदित्य योगेश टेकाळे इ.9वी बीड, कु.श्रद्धा संजय हत्ते इ.7वी तुळजापुर, उत्तेजनार्थ तेजस्विनी कल्याणावर आवरगंड, प्राची केशव जाधव, आरुषी सोमनाथ केवटे, श्रवण शरद अडसूळ,यश संतोष सूर्यवंशी, यशस्वी गोवर्धन माने.

     महाविद्यालयीन गटातील विजेते प्रथम पारितोषिक कु.प्रसाद सुहास लोखंडे कोल्हापूर, द्वितीय पारितोषिक कु. श्रुती अशोक बोरस्ते नाशिक, तृतीय पारितोषिक कु.हर्षवर्धन चंद्रकांत आलासे पुणे,उत्तेजनार्थ पारितोषिक कुलदीप रमेश ताम्हाणे, सेजल संतोष कवठेकर,यश रवींद्र पाटील सर्व विजेत्यांना रोख रक्कम सन्मान चिन्ह व गौरव पत्र देण्यात आले तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

     ज्यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सांगितले की महापुरुषाची जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांचा जागर व्हायला हवा तरुणाईने महापुरुषांचे विचार संपादित करून मार्गक्रमण करायला हवे,धाराशिव जिल्ह्यातून देखील अशा स्पर्धांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांमधून वक्ते तयार व्हावेत असा आशावाद व्यक्त केला.

     ज्येष्ठ नेते सुरेश देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की,डीजेच्या तालावर दारूच्या नशेत युवकांनी थिरकण्या ऐवजी विविध सामाजिक उपक्रम राबवून महापुरुषांची जयंती साजरी करणे हीच खरी श्रद्धांजली होय.

    सूत्रसंचालन संस्थेचे सचिव सचिन लोंढे यांनी केले या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, गटनेते युवराज नळे,माजी जिल्हा परिषद सदस्य येरकळ मॅडम, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगुडे विनोद गपाट,पांडुरंग लाटे,प्रमोद पाटील,चिंटू पाटील,ओम नाईकवाडी, स्वप्निल नाईकवाडी,कुलदीप भोसले, मनिषाताई केंद्रे, प्रसाद मुंडे,आनंद भालेराव,पुष्पाकांत माळाळे,खंडू ठवरे,मल्हारी जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश एडके,हिम्मत भोसले,सलमान शेख,जगदिश जोशी,शंकर मोरे,ओंकार देवकते,आशिष येरकळ,आदित्यराज इंगळे

 विशाल पाटील, मेसा जानराव,रोहित देशमुख, देवकन्या गाडे, सुधीर घोलप, ज्ञानेश्वर सुळ, ज्ञानेश्वर पडवळ, सार्थक पाटील, अभिषेक कोळगे, शुभम राखुंडे, धनराज नवले, उत्कर्ष देशमुख, ओंकार देशमुख, अक्षय भालेराव, मनोजसिंह ठाकुर, निरंजन जगदाळे, नवनाथ सोलंकर, अरविंद देवकते, आकाश शेंडगे प्रयत्न केले.

 

 
Top