धाराशिव / प्रतिनिधी-

 शहरातील शरद पवार हायस्कूल मध्ये २ ते २० मे पर्यंत सकाळी ७.३० ते १२ या वेळेत मोफत उन्हाळी सुट्टीत जागर फांउडेशन च्या वतीने योग , आधात्म ,     धनुर्विद्या, अक्षर        लेखन , चित्र, शिल्प ,       नृत्य ,नाटय ,गायन ,  वादन,संगीत,रांगोळी कार्यानुभव शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराच्या छोट्याखानी उद्‌घाटन प्रसंगी  जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या प्रमुख उपस्थीतीत व पत्रकार      संतोष जाधव , संस्कार भारती जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी संपन्न झाले प्रथम सरस्वती , छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्या नंतर या शिबीराचे प्रमुख तथा जागर फांउडेशन चे शीतल देशमुख , मुकुंद घाटगे यांनी मान्यवरांचे सत्कार केले. त्याचबरोबर देवगिरी प्रांत  संस्कार भारती निर्मित धाराशिव दैनंदिनी २३ -२४ भेट देण्यात आली .

 या शिबीराचे प्रशिक्षक जिल्हा कलाध्यापक संघ जिल्हाध्यक्ष नानासाहेब बोराडे, योग प्रशिक्षक डॉ. देडे , नाट्य विभाग डॉ. गणेश शिंदे, नृत्य विभाग विशाल टोले , चित्रकला विभाग सौ. अस्मिता    ठाकूर , रांगोळी विभाग सौ.गंगा लोमटे, पुस्तक वाचन बापू इंगळे, कैलास लांडगे, मनोज यादव , निलेश बागल, प्रविण सोनवणे, कलाध्यापक संघ व संस्कार भारतीचे वारंवार शिबीरासाठी नेहमी सहकार्य असते त्यामुळे प्रशिक्षक शेषनाथ वाघ तसेच पालक पवन सुर्यवंशी , राहुल पाटील , खरमाटेंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनोगत पर भाषणात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे म्हणाले की शालेय स्तरा पासूनच बालपणी छंद जोपासणे गरजेचे असते कारण भावी जीवनात कार्यव्यस्त तणावापासून मुक्तीसाठी जोपसलेल्या छंदामुळे तणाव मुक्त होतो त्यामुळे अश्या प्रकारच्या शिबीरांचा बालमनावर संस्कार होतात त्यामुळे पालकांनी शिबीरास प्रतिसाद दिल्याने आनंद वाटला . सुत्रसंचालन मुख्याध्यापक शशीकांत देशमुख यांनी केले .


 
Top