धाराशिव/ प्रतिनिधी 

 शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदी पात्राचे खोलीकरण, रूंदीकरण करुन सौंदर्यकरीण करण्यात यावे, अशी मागणी बहुजन योध्द्या सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.१५ मे रोजी शिष्टमंडळाने केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव जिल्ह्याची ओळख साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आई श्री तुळजाभवानीचा जिल्हा एवढीच आहे. जिल्हा सर्वांगीण विकासाच्या बाबतीत फारच मागासलेला असून त्यात शहराची ओळख म्हणजे धारासुर मर्दिनी मातेचे मंदिर व ख्वॉजा शमशोद्दीन गाजी रहे. दर्गाह एवढ्या पुरतेच मर्यादित राहिलेली आहे. तर शहराच्या मध्यवर्ती भागातून भोगावती नदीचे पात्र जात असले ते तरी आज घाणीच्या विळख्यात सापडले आहे. विशेष म्हणजे भोगावतीच्या पुलावरून मार्गक्रम करताना सर्व जनतेला दुर्गंधीच्या साम्राज्यातून मार्गक्रम करावे लागत आहे. तसेच भोगावती नदीपात्राच्या नजीकच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्यामुळे भोगावती नदीचा परिसर स्वच्छ करण्यात यावा, नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करून सौंदर्यकरण करण्यात यावे. तसेच शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा‌ व परिसरात लहान मुले वृद्धांसाठी उद्यान, वॉकिंग ट्रक, टॉकीज, कारंजे व बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात यावी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. यावर बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे, उपाध्यक्ष राजाभाऊ बागल, भाऊसाहेब उंबरे, कॅप्टन बुबासाहेब बागल, सचिव लक्ष्मण माने, शीला उंबरे, अप्सरा पठाण, ॲड. अक्षय देशपांडे, ॲड. अमोल वरुडकर, वल्लभ पवार, आबासाहेब खोत, सतीश कदम, रोहन माने, वैभव गायकवाड, नंदकुमार माने, दिलीप महाजन, विजयकुमार भन्साळी, यशवंत शिंगाडे, सुनील जोशी, शिवदास कांबळे, विजय काकडे, सय्यद खलील, मसूद शेख, महादेव लिंगे, आशिष विसाळ, युवराज नळे, अजिंक्य बनसोडे, प्रतीक कांबळे, प्रशांत भालेराव, अजित बागवान, बाळासाहेब सुभेदार, ॲड. ए.जी. शिंदे, शिवाजी सरडे व तौफीक खान आदींच्या सह्या आहेत.


 
Top