धाराशिव / प्रतिनिधी- 

महाराष्ट्र राज्य 19 वर्षाखालील मुलांच्या संघ निवड पूर्व पुणे येथे खेळवल्या गेलेल्या इन्विटेशन लीग सामन्यांमध्ये धाराशिवच्या संघाने आर्यन क्लब पुणे डीएआरसी क्लब पुणे,सीएमएक्लब पुणे,आणि नंदुरबार संघावर विजय प्राप्त करत आपल्या ग्रुपमध्ये 21 गुणांसह सर्वोच्च स्थान मिळवून धाराशिवचा संघ पुढील सुपर लीग सामन्यांसाठी पात्र ठरला आहे.

 संघाला सुपर लीग मध्ये पोहोचवण्यासाठी संघ प्रशिक्षक युवराज पवार यांचे मोलाचे योगदान लाभले. उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय दंडनाईक आणि सचिव दत्ता बंडगर यांनी संघ प्रशिक्षक युवराज पवार व सर्व खेळाडूंचे कौतुक करून पुढील सुपर लीग साठी त्यांना शुभेच्छा दिल्या .

 या संघातील खेळाडू खालील प्रमाणे- अनुराग कवडे (कर्णधार )आदिनाथ परळकर (उपकर्णधार ) मुवाज  शेख, प्रसाद देशमुख, आर्यन देशमुख,गणेश गुंड, योगेश कवडे,प्रसाद बहिरे,प्रथमेश पाटील,गगनदी पलाहे,श्रेयस सपकाळ,वीरेंद्र जाधव,विठ्ठल शिराळे,आयुष शिरसाट,युवराज थेवर सुपरलीग चे सामने दिनांक 4 मे पासून पुणे येथे खेळवले जाणार आहेत.


 
Top