नळदुर्ग / प्रतिनिधी- 

तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल मानेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सहशिक्षिका मनिषा कुलकर्णी--अपसिंगकर यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.

      मानेवाडीचे सरपंच नेहरू बंडगर,उपसरपंच  बालाजी लकडे,शाळेचे शालेय समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य शहाजी हाके, शालेय समितीचे अध्यक्ष विजय बंडगर ,तंटामुक्त समिती अध्यक्ष लक्ष्मण माने,श्री.बालाजी माने ,रेवाप्पा बर्वे यांनी मनिषा कुलकर्णी-अपसिंगकर यांचा सत्कार केला.यावेळी ग्रामसेवक,आशा कार्यकर्ते ,अंगणवाडी ताई तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.पालक बालाजी माने यांनी मनोगताद्वारे त्यांच्या मुलाची गुणवत्ता कुलकर्णी मैडम यांच्यामुळे वाढली व मुलांना शिस्त लागली असल्याचे सांगितले. अनेक नवनविन उपक्रम,विद्यार्थी व शाळा  गुणवत्ता वाढ होण्यासाठी सतत प्रयत्नशील  ,वक्तशीरपणा याबाबतही गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

           श्रीमती मनीषा कुलकर्णी-अपसिंगकर यांचे साहित्य क्षेत्रातहीअनेक काव्य, लेख प्रकाशित असुन स्वताचा "ओंजळ काव्यफुलांची" हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे.  नळदुर्ग (तानाजी जाधव) नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थेचे धाराशिव जिल्हा संघटक म्हणुन नळदुर्ग येथील परीवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव सचिव मारुती बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.   नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन, समाजकल्याण आयुक्तालय अंतर्गत काम करणारी संस्था आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,केदारनाथजी, माधवराव देशपांडे, लक्ष्मणराव केळकर, यांच्यासह अनेकांनीएकत्रीत येऊन दि.१६ ऑक्टोबर १९५८ साली या मंडळाची स्थापना केली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ही संस्था काम करीत आहे. व्यसनमुक्तीसाठी प्रचार, प्रसार व प्रबोधन करण्याचे काम या संस्थेकडुन करण्यात येणार आहे. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थेच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांच्या स्वाक्षरीचे मारुती बनसोडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.

           ही निवड एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधी करीता करण्यात आली आहे. या निवडबद्दल मारुती बनसोडे यांचे सर्व स्तरांतुन अभिनंदन होत आहे.


 
Top